सद्गुरु चिले महाराज पायी पादुका सोहळा; दि.26 जानेवारी रोजी मोर्वे येथे आगमन


स्थैर्य, फलटण दि.23 : शासनाच्या कोरोना नियमांचे पालन करुन फक्त 5 भाविकांसमवेत पादुका सोहळ्याची अनेक वर्षांची परंपरा जपत सद्गुरु चिले महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दि.15 जानेवारी रोजी जेऊर येथून प्रस्थान झाले असून हा पायी पादुका सोहळा मोर्वे येथील श्री दत्त मंदिरात मंगळवार, दि.26 रोजी येणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टंसिंग, तोंडाला मास्क लावून, सॅनिटायझरचा वापर करत सोहळ्याची परंपरा जपण्यासाठी फक्त 5 भाविकांसमवेत दि.15 जानेवारी रोजी जेऊर येथील मसाई देवी, श्री भैरवनाथ, श्री चिले महाराज यांच्या मूर्तीला अभिषेक घालून पायी पादुका सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले होते. दि.26 रोजी श्री दत्त मंदिर संस्थान, मोर्वे येथे पायी पादुका सोहळा येत असून धार्मिक कार्यक्रमांशिवाय इतर सर्व कार्यक्रम देवस्थानने रद्द केलेले आहेत याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थान, मोर्वे यांच्यावतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!