स्वातंत्र्यदिनानिमित्त फलटणमध्ये भव्य तिरंगा बाईक रॅली; मान्यवरांसह नागरिकांचा असणार सहभाग

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त फलटण शहरात १५ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यात नागरिकांनी सहभागी व्हावे.

स्थैर्य, फलटण, दि. १४ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून फलटण शहरात १५ ऑगस्ट रोजी भव्य ‘तिरंगा बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील प्रामुख्याने सहभागी होणार आहेत.

प्रांत कार्यालयापासून रॅलीला सुरुवात

स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि देशभक्तीची भावना द्विगुणित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही रॅली सकाळी ठीक आठ वाजता फलटण येथील प्रांत कार्यालयापासून सुरू होणार आहे. या रॅलीत केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने तिरंगा घेऊन सहभागी होणार आहेत.

नागरिकांना सहभागाचे आवाहन

देशभक्तीच्या या मंगलमय वातावरणात आणि राष्ट्रीय सणाच्या आनंदोत्सवात परिसरातील सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे. या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!