जनसेवा वाचनालयातर्फे भव्य वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन


दैनिक स्थैर्य | दि. १९ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
मॅग आणि माऊली फाउंडेशन संचलित जनसेवा वाचनालय हे अल्पकाळात फलटण व परिसरामध्ये प्रसिद्ध झाले आहे. जनसेवा वाचनालयाच्या माध्यमाने सध्या ‘वाचन कट्टा’ असे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. आता जनसेवा वाचनालयाच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि मुलांच्या प्रज्ञा-पंखांना विस्तीर्ण आकाश देण्यासाठी विविध वयोगटात वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा दिनांक १, २ आणि ३ डिसेंबरदरम्यान आयोजित केल्या आहेत.

या कार्यक्रमाचे पारितोषिक प्रायोजक मॅग फिनसर्व कंपनी फलटण हे आहेत. नाव व नोंदणी अंतिम तारीख २५ नोव्हेंबर २०२३ असून या वक्तृत्व व निबंध स्पर्धा विविध वयोगटात घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक गटासाठी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय अशी बक्षिसे व सहभागी प्रत्येकाला प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

वक्तृत्व स्पर्धांचे वयोगट, विषय व बक्षिसे पुढीलप्रमाणे :

वयोगट ३ री ते ५ वी, वेळ : ३ मिनिटे, विषय – माझे आवडते शास्त्रज्ञ, माझे आवडते महापुरूष, माझे स्वप्न, खेळाचे महत्त्व, स्वच्छता आणि मी, पारितोषिक – अनुक्रमे १५००, १००० व ५०० रूपये.

वयोगट ६ वी ते ८ वी, वेळ : ३ मिनिटे, विषय – वत्याचा आवडता विषय, माझे आवडते महापुरूष, मी… झालो तर, मोबाईल खेळ एक घातक व्यसन, पाणी गरज आणि जबाबदारी, पारितोषिक – अनुक्रमे २०००, १५०० व १००० रूपये.

वयोगट ९ वी ते १२ वी, वेळ : ५ मिनिटे, विषय – वत्याचा आवडता विषय, प्लास्टिकमुत भारत, मी… झालो तर, स्त्री समाज सुधारक, समाज माध्यमांच्या विळख्यात तरुणाई, पारितोषिक – अनुक्रमे २०००, १५०० व ११०० रूपये.

वयोगट महाविद्यालयीन, वेळ : ७ मिनिटे, विषय – वत्याचा आवडता विषय, कोरोना वैश्विक महागुरू, ‘ऑन लाईन शिक्षण’ तारक की मारक, आजची कुटुंब व्यवस्था, शाश्वत विकास आणि पर्यावरण, पारितोषिक – अनुक्रमे ३०००, २००० व १००० रूपये.

निबंध स्पर्धांचे वयोगट, विषय व बक्षिसे पुढीलप्रमाणे :

वयोगट ६ वी ते ८ वी, शब्दमर्यादा १५० ते २००, विषय – खेळ आरोग्याचे वरदान, माझे आवडते शास्त्रज्ञ, माझे आवडते समाज सुधारक, माझा आवडता छंद, पृथ्वीचे मनोगत, पारितोषिक – अनुक्रमे २०००, १५०० व १००० रूपये.

वयोगट ९ वी ते १२ वी, शब्दमर्यादा २५० ते ३००, विषय – मी… झालो तर, शेतकरी संपावर गेला तर, भ्रष्टाचार मुत भारत, कोरोना नंतरचे जग, पारितोषिक – अनुक्रमे २०००, १५०० व १००० रूपये.

वयोगट महाविद्यालयीन, शब्दमर्यादा ५०० ते ७००, विषय – सायबर विश्व व तरुणांची ढासळती मानसिकता, प्लास्टिक मुत भारत, आजचे उत्सव : दिशा व दशा, शाश्वत विकास आणि पर्यावरण, आजची कुटुंबव्यवस्था, पारितोषिक – अनुक्रमे ३०००, २००० व १००० रूपये.

नावनोंदणीसाठी स्पर्धकांनी जनसेवा डायग्नॉस्टिक सेंटर (९५२९२३३०६७), मॅग फिनसर्व कं. ऑफिस डॉ. आंबेडकर चौक – पोद्दार मॅडम (९२८४७०३६९१), तात्या गायकवाड (८६००३९२४४४), उस्मान शेख (९१५८८८४७०७) व गणेश बोराटे (९९२२५७५७८६) येथे संपर्क साधावा.

या स्पर्धांचे सविस्तर वेळापत्रक वेळ, ठिकाण दिनांक २८/११/२०२३ रोजी जाहीर केले जाणार आहे.

या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन जनसेवा वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!