जनसेवा वाचनालयाकडून मुलांसाठी एकपात्री अभिनय व स्वरचित काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ४ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण येथील मॅग आणि माऊली फाऊंडेशन संचालित जनसेवा वाचनालयाकडून मुलांच्या कलागुणांना विस्तीर्ण आकाश देण्यासाठी दि. १३, १४ व १५ मे २०२४ दरम्यान एकपात्री अभिनय स्पर्धा व स्वरचित काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांवर रोख बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.

या स्पर्धेसाठीच्या नावनोंदणीची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२४ आहे.

एकपात्री अभिनय स्पर्धा व स्वरचित अभिनय स्पर्धा ५ वी ते ८ वी, ९ वी ते १२ वी व मुक्त गट अशा तीन वयोगटात होणार आहेत.

वयोगट ५ वी ते ८ वीसाठी वेळ : ३ ते ५ मिनिटे, विजेत्यांसाठी पारितोषिक अनुक्रमे प्रथम तीन क्रमांसाठी रूपये २०००, १५०० व १००० दिले जाणार आहेत.

वयोगट ९ वी ते १२ वीसाठी वेळ : ५ ते ७ मिनिटे, विजेत्यांसाठी पारितोषिक अनुक्रमे रूपये २०००, १५०० व ११०० दिले जाणार आहेत.

मुक्त वयोगटासाठी वेळ : ५ ते ७ मिनिटे, विजेत्यांसाठी पारितोषिक अनुक्रमे रूपये २५००, २००० व १५०० दिले जाणार आहेत.

स्वरचित काव्य वाचन स्पर्धेसाठी वेळ सर्वांसाठी ३ मिनिटे राहणार आहे.

स्पर्धेचे नियम :

  1. एका विद्यार्थ्यास दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेता येईल.
  2. काव्य स्पर्धेत भाग घेणार्‍या स्पर्धकांनी आपली स्वरचित कविता लिखित स्वरूपात १ मे पर्यंत जनसेवा
  3. वाचनालयात सादर करावयाची आहे.
  4. सदर कविता इंटरनेटवर किंवा इतर माध्यमांवर इतरांच्या नावे आहे का, याची पडताळणी करण्यात येईल.
  5. आपली स्वरचित कविता मराठी, हिंदी, इंग्रजी उर्दू यापैकी कुठल्याही भाषेत सादर केली तरी चालणार आहे.
  6. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.

सर्व पारितोषिके ‘मॅग फिनसर्व कं.लि., फलटण यांनी प्रायोजित केली आहेत.

नोंदणीसाठी संपर्क :
उस्मान शेख – ९४२२६०३४२६
गणेश बोराटे – ९९२२५७५७८६
जनसेवा वाचनालय – ९५२९२३३०६७


Back to top button
Don`t copy text!