भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने डॉ. प्रसाद जोशी यांचा सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ५ एप्रिल २०२४ | फलटण |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने डॉ. प्रसाद जोशी यांना ‘बेस्ट आर्थोपेडीक सर्जन’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटणचे सर्वेसर्वा, प्रख्यात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांचे ‘भारतीय वैद्यक पुरस्कार २०२४’ साठी (Indian Medical Awards 2024) तालुकास्तरावर सर्वोत्कृष्ट अस्थिरोगतज्ज्ञ (Best Orthopedic surgeon) म्हणून नामनिर्देशन झाले आहे.

ग्रामीण भारतामध्ये विशेषत: फलटण, महाराष्ट्र या भागात त्यांनी केलेल्या कामाची नोंद घेऊन हे नामांकन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठेच्या व सन्मानाच्या पुरस्कारासाठी डॉ. प्रसाद जोशी यांचे नामांकन झाल्याबद्दल त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सत्कारावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री. दिनेश अहिवळे, उपाध्यक्ष श्री. सनी कदम, श्री. दादा अहिवळे माजी अध्यक्ष, श्री. विजय भोंडवे, श्री. दादा काकडे, श्री. सचिन मोरे, श्री. संजय मोरे, श्री. आनंद जगताप, श्री. अजित फरांदे हे उपस्थित होते.

या पुरस्कार वितरणप्रसंगी ‘विश्वसनीय डॉक्टर’ (Most Trusted Doctor) हा सन्मान सुद्धा डॉ. जोशी यांना बहाल करण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!