जीवनात आनंद द्यायला व घ्यायला शिकावे – डॉ दत्तप्रसाद दाभोळकर


दैनिक स्थैर्य । दि. १० ऑक्टोबर २०२२ । सातारा । जीवनामध्ये आनंद घ्यायला शिका व आनंद द्यायला शिका आणि हे असे करणेच महत्त्वाचे आहे असे विचार ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी सातारा येथे बोलताना मांडले. यावेळी त्यांच्या हस्ते वैवाहिक जीवनाला पन्नास वर्षे झालेल्या  सभासद दांपत्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
सातारा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी डॉ दत्तप्रसाद दाभोळकर बोलत होते. सातारा येथील ज्येष्ठ कापड व्यावसायिक धनराज लाहोटी  यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीमती वैदेही देव होत्या. विचारमंचावर कार्यवाह विजय मांडके व उपाध्यक्ष श्रीमती ज्योती मोहिते होत्या.                          डॉ दत्तप्रसाद दाभोळकर म्हणाले की , ‘  ज्येष्ठ नागरिक संघाने ५० वर्षे वैवाहिक जीवन यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या ज्येष्ठ दांपत्यांचा  केलेला सत्कार हा अतिशय महत्त्वाचा व दुर्मिळ  आहे.
ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद  बघितल्याने मला समाधान वाटते. असा आनंद देणे घेणे हेच माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन धनराज लाहोटी यांनी यावेळी बोलताना केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना श्रीमती वैदेही देव यांनी जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला व यापुढेही विविध उपक्रम राबवून यशस्वीरित्या पुढील काळात काम करूयात असे आवाहन केले.
यावेळी सूर्यकांत व सौ प्रभावती जाधव , कमलाकर सावंत व सौ कुसुम सावंत , रमणलाल शहा व सौ मीरा शहा , सुरेश महाजनी व सौ.  प्रतिम महाजनी , अर्जुन मोरे व सौ शोभा मोरे या दांपत्यांचा वैवाहिक जीवनास पन्नास वर्षे झाल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.  कार्यवाह विजय मांडके यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. खजिनदार मदनलाल देवी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रारंभी श्रीमती आशा बोडस , सौ सुमन डोंगरे.  सुधा घोडके व श्रद्धा बहुलेकर यांनी साने गुरुजींची खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना स्वागत गीत म्हणून सादर केली.  श्रीमती ज्योती मोहिते यांनी आभार प्रदर्शन केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. महात्मा गांधी तसेच राजमाता सुमित्राराजे भोसले आणि माधवराव धुमाळ गुरुजी यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष भिकाजीराव सूर्यवंशी ,  सहकार्यवाह अशोक कानेटकर ,  गौतम भोसले  , प्रल्हाद मायणे व व उपस्थितांनी विशेष सहकार्य केले

Back to top button
Don`t copy text!