
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑगस्ट २०२६ | सातारा |
बेकरी व्यावसायिकाला रोख रकमेच्या बदल्यात ऑनलाइन पैसे देतो, असे सांगून त्याच्याकडून ५८ हजारांची रोकड घेऊन एक तरुण पसार झाला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अनोळखी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना दि. रोजी महामार्गालगत घडली. याबाबत ऋषिकेश शिंदे (वय २९, रा. कोडोली) या बेकरी व्यावसायिकाने तक्रार दिली आहे.
अजंठा चौकात अॅक्सिस बँक आहे. या बँकेसमोर एक अनोळखी व्यक्ती त्यांना भेटला. मला रोख रकमेची गरज आहे. तुम्हाला ऑनलाइन पैसे पाठवितो, असे त्याने शिंदे यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी त्याला ५८ हजार रुपये रोख रक्कम दिली. परंतु, त्याने ऑनलाइन पैसे न पाठवता तो पळून गेला. महिला हवालदार अवघडे याचा अधिक तपास करत आहेत.
