पुष्ठा बनविणारी खराब मशीन दिली; पंजाबच्या तिघांवर सातार्‍यात गुन्हा दाखल

दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑगस्ट २०२६ | सातारा |
पुष्ठा बनविणारी चांगली मशिनरी देतो, असे सांगून ६ कोटी ३५ लाख ७ हजार ६०० रुपये घेऊन खराब मशीन दिल्याप्रकरणी पंजाबमधील तिघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

मुक्तारसिंग थिंड, अमरदीपसिंग ऊर्फ दीपू मुक्तारसिंग थिंड, अविनाश ऊर्फ आशू मुक्तारसिंग थिंड (सर्व रा. अमृतसर, पंजाब) यांच्या विरुद्ध महिलेने तक्रार दिली. फसवणुकीची घटना २०२३ पासून वेळोवेळी घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सातार्‍यातील तक्रारदार महिला या व्यावसायिक आहेत. पुष्ठा बनवण्यासाठी त्यांना मशिनरी लागणार होत्या. संबंधित मशिनरीसाठी एमएस सीनिअर मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग या कंपनीसोबत संपर्क केला. कंपनीसोबत चर्चा झाल्यानंतर पुष्ठा तयार करण्याच्या कंपनीमध्ये कच्चा माल तयार करण्यासाठी लागणार्‍या चांगल्या मशिनरी देण्याचे ठरले.

संशयितांना आरटीजीएसद्वारे ६ कोटी ३५ लाखांची रक्कम पाठवली. मात्र, मशीन आल्यानंतर त्या खराब होत्या. त्याबाबत वेळोवेळी तक्रारदार यांनी तक्रार केली. मात्र, संशयितांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे पैसे घेऊन नव्या मशीन न देता फसवणूक झाल्याने तक्रारदार यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Back to top button
Don`t copy text!