बजाज फायनान्सच्या कर्जामुळे साखरवाडीच्या एकाची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २१ मे २०२४ | फलटण |
बजाज फायनान्सचे कर्ज झाल्यामुळे साखरवाडी (ता. फलटण) येथील एकाने रविवार, दि. १९ मे २०२४ रोजी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेची आकस्मात मृत्यू म्हणून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

विशाल हनुमंत फरतरे (वय ३५, राहणार साखरवाडी, तालुका फलटण) असे मृताचे नाव आहे.

या घटनेची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, साखरवाडी (ता. फलटण) येथील विशाल फरतरे यांनी रविवार, दि. १९ मे २०२४ रोजी रात्री बजाज फायनान्सचे कर्ज झाल्यामुळे व दारूच्या नशेत साडीने जिल्हा परिषद शाळा (जुनी) येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हजारे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!