पेटीएमकडून यूपीआय लाइटसह एकाच क्लिकमध्‍ये पेमेंट्स करण्‍याची सेवा


दैनिक स्थैर्य । दि. ०२ मार्च २०२३ । मुंबई । पेटीएम यूपीआय लाइट वापरकर्त्‍यांना पेटीएम सुपर अॅपवर अत्‍यंत गतीशीलपणे जलद व एकसंधी व्‍यवहार करण्‍यास सक्षम करते. वापरकर्ते एकाच वेळी जवळपास २०० रूपयांपर्यंतच्‍या लहान मूल्‍यांचे अनेक व्‍यवहार करू शकतात. ही सेवा वापरकर्त्यांना दिवसातून दोनदा अधिकतम २,००० रूपयांची भर करण्‍याची सुविधा देते, ज्‍यामुळे एकाच टॅपमध्‍ये एकूण दैनंदिन वापर जवळपास ४,००० रूपयंपर्यंत करता येतो.

पेटीएम यूपीआय लाइट गतीशील रिअल-टाइम व्‍यवहार देते, जेथे कोणतेही पेमेंट करण्‍यासाठी ४ ते ६ अंकी पिन क्रमांकाची गरज नाही. सुलभता, सोयीसुविधा, उच्‍च दर्जाचा युजर अनुभव, सुरक्षितता व इंटरऑपरेबिलिटी पाहता पेटीएम यूपीआय वापरकर्त्‍यांचे सर्वात पसंतीचे साधन आहे. पेटीएम यूपीआय लाइट ‘ऑन-डिवाईस वॉलेट’ आहे, जे रिअल-टाइम लहान मूल्‍यांचे पेमेंट्स शक्य करते, ज्‍यामुळे मुलभूत बँकिंग सिस्‍टमवरील भार कमी होतो.

सध्‍या, यूपीआयचे ग्राहक फक्‍त यूपीआय लाइट अकाऊंट्स सुरू शकतात. तसेच वापरकर्त्‍यांनी त्‍यांची बँक खाती यूपीआय लाइट वैशिष्‍ट्याशी संलग्‍न असल्‍याची खात्री घेण्‍याची गरज आहे. वापरकर्ते कधीही त्‍याच बँक खात्‍यामध्‍ये पुन्‍हा यूपीआय बॅलन्‍स हस्‍तांतरित करू शकतात, ज्‍यासाठी कोणतेही शुल्‍क आकारले जात नाही. तसेच ते सर्व यूपीआय लाइट पेमेंट्ससाठी फक्‍त एकाच एंट्रीसह बँक स्‍टेटमेंट्स देखील कमी करते.

पेटीएम यूपीआय लाइटचा लहान मूल्‍यांचे व्‍यवहार विनासायास, जलद व एकसंधी करण्‍याचा मनसुबा आहे. हे यूपीआय व्‍यवहारांसाठी यशस्‍वी दर देखील सुधारते, तसेच रेमिटर बँकेच्‍या सिस्‍टम्‍सवरील इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर भार देखील कमी करते. ही प्रक्रिया इतकी सोपी आहे की, वापरकर्ते वन-क्लिक सिंगल-फॅक्‍टर ऑथेन्टिकेशनसह किराणा मालासाठी देय भरताना किंवा फोन बॅलन्‍स भरताना लहान मूल्‍याचे व्‍यवहार करू शकतात.

संपूर्ण अनुभव जलद व एकसंधी करत कंपनी वापरकर्त्‍यांना एकाच दिवसामध्‍ये एकाच क्लिकमध्‍ये जवळपास ४,००० रूपयांपर्यंतचे अनेक व्‍यवहार करण्‍यास सक्षम करते, ज्‍यासाठी अधिकाधिक बँक व्‍यवहार होण्‍याबाबत चिंता करण्‍याची गरज नाही. पेटीएम ही यूपीआय व्‍यवहार करण्‍यामध्‍ये सर्वात कमी व्‍यवहार अयशस्‍वी ठरण्‍याच्‍या दरासह उद्योगातील गतीशील कंपनी आहे.


Back to top button
Don`t copy text!