दैनिक स्थैर्य | दि. १७ एप्रिल २०२३ | फलटण |
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार, दि. १८ रोजी श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, बुधवार पेठ, शिवाजी रोड फलटणच्यावतीने नवलबाई मंगल कार्यालय येथे प.पू.राजनकाका देशमुख महाराज यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, दि. १८ एप्रिल रोजी नवलबाई मंगल कार्यालय, फलटण येथे सकाळी ८.०० वाजता श्रींचा अभिषेक, महाआरती, मंत्र, नामस्मरण, वास्तूशास्त्र, पितृषास्त्र, संख्याशास्त्र, शिवसरोदय शास्त्र याविषयी प.पू. राजनकाका देशमुख महाराज यांचे प्रवचन होणार आहे.
सदर कार्यक्रमास श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष प.पू. सुदामराजबाबा विद्वांस, व्यसनमुक्त संघटनेचे प. पू. धैर्यशीलभाऊ देशमुख, प. पू. नवनाथ महाराज (शेरेचीवाडी) हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
सायंकाळी ६.३० वाजता आरती व नंतर महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ बुधवार पेठ यांच्या वतीने करण्यात आले आहे.