डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १७ एप्रिल २०२३ | फलटण |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, पत्रकार प्रा. रमेश आढाव सर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, उपजिल्हा रुग्णालय फलटणमधील डॉ. अंशुमन धुमाळ, डॉ. धनंजय गायकवाड, व व्ही. टी. पवार सहाय्यक आयुक्त, डॉ. ढाणे, डॉ. श्रीवास्तव, डॉ. आब्दागिरे, डॉ. प्रतिमा बर्डे, श्री. लक्ष्मण शिंदे पत्रकार, श्री. राजेन्द्र गोडसे पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कोविड काळात रुग्णांना मदत करणारे डॉक्टर, वकील, पशूवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, व उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुलाबाचे फुल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अन्नदानाचा लाभ अनेक प्रवाशांनी व नागरिकांनी घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटना रिक्षा स्टॉपवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

या कार्यक्रमास रिक्षाचालक, मालक, प्रवाशी वर्ग, फलटण एस. टी. डेपोतील कामगार वर्ग उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री. दिनेश अहिवळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. संघटनेचे उपाध्यक्ष श्री. सनी कदम यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!