आज फलटणमध्ये सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. 03 जानेवारी 2024 । फलटण । क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले प्रेमी फलटण तालुका यांच्याकडून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज बुधवार, दि. ३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक, फलटण येथे आयोजित केले असून समाजातील सर्व घटकांनी या शिबिरामध्ये आपले योगदान देऊन सहकार्य करावे, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.

शिबिरासंबंधी अधिक माहितीसाठी ८४८२९६३१०१, ९८२२६२०६२०, ८३२९६७६५८२, ८३०८२१७३०० व ९०४९५६३१११ या मोबाईलवर संपर्क साधावा. दरम्यान, रक्तदान करणार्‍या प्रत्येक रतदात्यास प्रोत्साहनपर भेट देण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!