भीमा कोरेगावच्या शौर्य विजय स्तंभास फलटण येथे अभिवादन


दैनिक स्थैर्य | दि. 03 जानेवारी 2023 | फलटण | येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने  206 वा शौर्य दिन उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. कोरेगाव भीमा येथील शौर्य विजय स्तंभाची प्रतिकृती तयार करून विजय स्तंभाला अभिवादन करण्यात आले.

यावेळी बुद्धवंदना म्हणण्यात आली व विजयस्तंभास सलामी देण्यात आली. विजय स्तंभाला फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. ज्या बांधवांना कोरेगाव भीमा येथे जाता येत नसेल अशा अनुयायांसाठी कोरेगाव भीमा शौर्य विजय स्तंभाची प्रतिकृती डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने तयार करण्यात आली होती.

शौर्यदिन्ना निमित्त अनेक  आंबेडकर अनुयायांनी विजयस्तंभास अभिवादन केले. या विजयी स्तभांची प्रतिकृती तयार करून येथेच अभिवादन करण्याची सोय केल्याबद्दल अनेक आंबेडकर अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे कौतुक केले.

या विजयी स्तभांस सर्व रिक्षा चालक – मालक यांच्या वतीने सलामी देण्यात आली; यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे सर्व चालक – मालक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!