महापरिनिर्वाणदिनी महामानवाला घरुनच अभिवादन करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.५ : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 6 डिसेंबर 2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 वा महापरिनिर्वाणदिन साध्या, सोप्या पध्दतीने व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन साजरा करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 ये कलम 144 मधील तरतूदीनुसार मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. याबाबतचा आदेश जारी केला आहे.

राज्यात, तसेच सातारा जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. कोरोना प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात-आठ महिन्यात आलेले सर्व धर्मीय सण, उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने एकत्रित न येता लोकांनी साजरे केले आहेत. त्यामुळे यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर 2020 रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रमही पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पध्दतीने पार पाडण्यात यावा. कोविड विषाणूच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी दादर येथे येण्यावर निर्बंध असल्याने व दादर, तसेच महाराष्ट्रातील अन्य रेल्वे स्थानकांवरही गर्दी करण्यास निर्बंध असल्याने शासनातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रसारण करण्यात येणार आहे. त्यामुळे अनुयायांनी दादर येथे न येता घरातूनच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. महानिर्वाणदिन हा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याने कोरोना संसर्गाचा विचार करता सर्व अनुयायांनी विचारपूर्वक व धैर्याने वागावे व घरी राहूनच परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याची विनंती सर्व अनुयायांना विनंती करण्यात यावी. 

अभिवादन करण्याचा कार्यक्रम हा जिल्ह्यातील सर्व तालुके शहर, गावांमध्ये आयोजित करण्यात येत असतो. या कार्यक्रम ठिकाणी गर्दी होणार नाही याची आयोजकांनी खबरदारी घ्यावी. कोविड -१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैदयकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्यक्ष महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!