
स्थैर्य, फलटण दि.२९ : दरवर्षी फलटण तालुक्यातील आंबेडकर अनुयायी, संस्था, संघटना भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने जात असतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव येथे न जाता गाव तिथे अभिवादन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती २०२१ फलटण तालुक्यात प्रयत्न करीत आहेत. तरी १ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वा.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विजयस्तंभाची प्रतिकृती तयार करून मानवंदना देण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, फलटण २०२१ च्या वतीने करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमानुसार संपन्न होईल, असेही समितीकडून सांगण्यात आले.