मांढरदेव येथे बेवारस युवकाचा मृतदेह आढळला


स्थैर्य, वाई दि. ३० : मांढरदेव ता. वाई येथे बेवारस युवकाचा मृतदेह आढळल्याची फिर्याद पोलीस पाटील  जयश्री सुनील मांढरे यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे.
 वाई पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, काळुबाईची जाळी जुने ठाण या ठिकाणी असले पुलाचे डाव्या  बाजूस असले भोर बाजूचे दरीत पाय वाटेने चालत जावून फिर्यादीनी समक्ष पाहिले असता तेथे एक पुरूष
जातीचे प्रेत वय अंदाजे 35 ते 40 वर्ष , रंग सावळा, बांधा मजबुत, उंची फूट तीन इंच, अंगात  पांढरे रंगाचा फुल बाह्याचा
शर्ट, पांढरे रंगाचे बनियन, तांबड़े रंगाची अंडरवेअर व गुडघ्या पासून खाली आलेली काळे रंगाची पँन्ट, पायात आकाशी रंगाचे साँक्स व काळे रंगाचा बुट, त्याचे चेह-यावर रक्ताचे डाग. तसेच सदर प्रेताचे गळ्यात लाल रंगाचा
दोरा त्यामध्ये म्हसोबाचा फोटो, पोटावर खरचटलेले असे मयताचे  वर्णन दिसून आलेले आहे.
सदरच्या युवकाचा घातपात करून  खून झाला असल्याची चर्चा परिसरात होती. अधिक तपास वाई  पोलीस नायक एस एस वायदंडे करीत  आहेत

Back to top button
Don`t copy text!