फलटण टायर असोसिएशनचा दरवाढीचा एकमताने निर्णय

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›
स्थैर्य, फलटण दि.२९: फलटण टायर असोसिएशनच्या वतीने सध्याच्या वाढत्या महागाईचा विचार करून व गेल्या पाच वर्षात कोणतीही दरवाढ न केल्याने १ जानेवारी २०२१ पासून दवाढीचा निर्णय एकमताने घेण्यात आला असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कारंडे यांनी दिली.
फलटण टायर असोसिएशनची पदाधिकारी बैठक नुकतीच सम्पन्न झाली. त्यावेळी दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीस असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!