बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन व श्रामनेर शिबीर सांगता समारंभ उत्साहात संपन्न


दैनिक स्थैर्य । दि. ७ ऑक्टोंबर २०२२ । मुंबई । बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व श्रामनेर शिबिर याचा सांगता समारंभ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, प्लॉट नं. ६२-ए, सेक्टर – २९ नवी मुंबई, येथे इंदू मिलचे प्रणेते, बौद्धजन पंचायत समितीचे सभापती, सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती विनोदजी मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष किशोरजी मोरे, सरचिटणीस राजेश घाडगे, खजिनदार नागसेन गमरे, उपकार्याध्यक्ष मनोहर मोरे, एच. आर. पवार, संस्कार समिती अध्यक्ष मंगेश पवार, सरचिटणीस मनोहर बा. मोरे, चिटणीस प्रमोद सावंत, अतिरिक्त चिटणीस रवींद्र पवार आदी व्यवस्थापन मंडळाचे मान्यवर, विविध समित्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार समितीचे सरचिटणीस मनोहर बा. मोरे यांनी केले तर प्रास्ताविक संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी केले, सदर प्रसंगी अध्यक्षीय भाषणात मा. आनंदराज आंबेडकर साहेब म्हणाले की “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागभूमी नागपूर येथे सम्राट अशोक विजयादशमीच्या दिवशी जी धर्मांतराची यशस्वी पताका फडकवली त्यामागील पार्श्वभूमी, कारणमीमांसा व काळाची असलेली गरज यावर विस्तृत विश्लेषण करून त्याची माहिती दिली, तसेच सध्या आपली जी मुख्य बौद्ध स्थळे आहेत त्यावर छुप्या मार्गाने परधर्मियांचे होत असलेले अतिक्रमण यावर त्यानी प्रकाश टाकला, बोधगया त्याचबरोबर दीक्षाभूमी येथे आर.एस.एस. प्रणित विचारधारेची होत असलेली घुसखोरी ही धोक्याची सूचना आहे परंतु तरीही समाजाच तिथे होणारे दुर्लक्ष ही खेदजनक बाब आहे, म्हणून आता तरी समाजाने वेळीच जागृत व एकसंघ होऊन समाजविघातक कारवाईना आळा घालणे आवश्यक आहे, सध्या चीवर परिधान केलेले काही बहुरूपी धम्मप्रचारक आपल्या जनसामान्यांमध्ये घुसून तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेबांचे विचार मलिन करण्याचा व समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून वेळीच सतर्कता घेऊन, तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, धम्म, धम्मप्रणाली तसेच बौद्ध धार्मिक स्थळांचे जतन, संवर्धन करायला हवे, जेणेकरून कोणीही तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेबांचे विचार पुसण्याचा प्रयत्न करणार नाही” असे प्रतिपादन त्यानी केले.

सदर प्रसंगी पूज्य भदंत मेत्ताधम्मो महाथेरो (संघनायक) यांनी धम्मदेसना देऊन सर्व उपासक, उपासिकांना बौद्ध धम्माचे सार समजावून सांगितले, सरतेशेवटी समितीचे चिटणीस राजेश घाडगे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.


Back to top button
Don`t copy text!