१२ वीचा निकाल उद्या जाहीर होणार! दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार निकाल; १४.१७ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या (HSC) परीक्षेचा निकाल शनिवार, दि. २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन जाहीर होणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १ मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) वतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यांत घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या (HSC) बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख अखेर अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धाकधूक आता संपली असून, शनिवार, दिनांक २ मे २०२६ रोजी दुपारी ठीक ०१:०० वाजता हा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.

या अधिकृत वेबसाईट्सवर पाहता येईल निकाल:

मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना त्यांचा ऑनलाईन निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर (Websites) पाहता आणि डाऊनलोड करता येईल:

निकाल पाहण्यासाठी खालील तपशील आवश्यक:

विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी वेबसाईटवर गेल्यानंतर खालील माहिती अचूक भरणे आवश्यक आहे: १. विद्यार्थ्याचा स्वतःचा परीक्षा आसन क्रमांक (Seat Number) २. विद्यार्थ्याच्या आईचे नाव (Mother’s First Name)

१४.१७ लाख विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा:

यावर्षी फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये राज्यभरातील विविध केंद्रांवरून तब्बल १४ लाख १७ हजार (१४.१७ लाख) विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली होती. उद्या जाहीर होणाऱ्या या निकालासाठी सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना ‘दैनिक स्थैर्य’ परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!


Back to top button
Don`t copy text!