दैनिक स्थैर्य । दि. २३ जानेवारी २०२३ । मुंबई ।अभिनेता, नाटककार आणि दिग्दर्शक ओम कटारे यांचा रंगभूमी समूह ‘यात्री थिएटर’ला यावर्षी ४४ वर्ष पूर्ण होत आहेत. जीना इसी का नाम है नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाद्वारे ते हा खास क्षण साजरा करणार आहेत. जीना इसी का नाम है ही एका महान भारतीय उद्योजकाची प्रेरणादायी कथा आहे. हा विशेष प्रयोग मंगळवार दि. २४ जानेवारी २०२३ रोजी पृथ्वी थिएटर, जुहू येथे सायंकाळी ७ ते ९ या वेळेत रंगणार आहे.