“पुरानी जीन्स ओर गिटार” १६ वर्षानंतर भेटले जुने मित्र


दैनिक स्थैर्य । दि. २९ मे २०२३ । बारामती । अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या  तुळजाराम चतुरचंद कॉलेज, कॉमर्स फॅकल्टीच्या २००७ ( बी. कॉम) च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल १६ वर्षानंतर हॉटेल कृष्ण सागर, बारामती येथे दिनांक २७ मे २०२३ रोजी पार पाडला.
यावेळी तब्बल ६५ विद्यार्थी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला व बऱ्याच वर्षानंतर मित्र – मैत्रिणी भेटल्यानंतर काहींना गहिवरून आले व सगळ्यांनी मिळुन आनंद द्विगुणित केला. सर्वांनी आपली ओळख करून देत असताना कॉलेज मधील आनंदाचे काही किस्से सांगत पुन्हा एकदा कॉलेज दिवसाचा आनंद लुटला. तसेच आपल्या कामकाजाचा व कार्यक्षेत्राचा आढावा घेतला जेणेकरून भविष्यात एकमेकांना मदत करता येईल.
आपले पद, प्रतिष्ठा, कामाचा व्याप बाजुला ठेवून सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता. कार्यक्रमामध्ये १६ वर्षांत गमावलेल्या राजु राक्षे, अरुण टाकसाळे, दीपक पवार माजी  प्राचार्य. श्री. डी.एन. काळे सर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. भविष्यात आपल्या मित्रांना अडीअडचणीत मदत करण्याचा व एकमेकांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्धार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजन संतोष मलगुंडे, फारुख शेख, मकरंद वारे, तानाजी शेंडे, अझहर पठाण आणी आलिशा आखाडे यांनी केले. सूत्रसंचालन तानाजी शेंडे, अलीशा आखाडे , फारूख शेख, अझहर पठाण यांनी केले तर आभार संतोष मलगुंडे व मकरंद वारे यांनी मानले.
वृषरोपण ही काळाची गरज असल्याने प्रत्येकाणे घरासमोर वृषरोपण करण्यासाठी रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.

Back to top button
Don`t copy text!