नवीन संसद भवनच्या उद्घाटन सोहळा हा आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण : खासदार रणजितसिंह


दैनिक स्थैर्य । दि. २९ मे २०२३ । फलटण । नवीन संसद भवनाचे उद्घाटन तसेच लोकार्पण, समस्त देशवासियांसाठी अभिमानाची व सन्मानाची बाब असून या अभूतपूर्व सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले असून सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचा योग मला मिळाला हे माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण होता, अश्या भावना माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केल्या.

देशाच्या राजधानीमध्ये नव्या संसद भवनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, उपमुख्यमंत्री, दोन्ही सभागृहाचे खासदार, विविध मंत्रालयांचे सचिव, माजी केंद्रीय मंत्री, संसदेचे दोन्ही सभागृहांचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते. नवीन संसदेच्या निर्मितीबाबत बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले आहे, ही देशातील जनतेसाठी सन्मानाची बाब आहे.

 

आज या वास्तूचे लोकार्पण झाले असून संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा या नवीन वास्तूच्या माध्यमातून लोकशाही अधिक बळकट, वृद्धिंगत होईल, असा विश्वास खासदार रणजितसिंह यांनी यावेळी व्यक्त केला. आजचा दिवस हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे; असेही ते म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!