स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोहरीच्या तुटवड्यामुळे एक महिन्यापासून तेल गिरण्या बंद

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 7, 2021
in इतर
ADVERTISEMENT

स्थैर्य, दि.७: कोरोना काळात मोठ्या जोमाने सुरू असलेला मोहरीच्या तेलाचा उद्योग आता अनलॉकच्या काळात गेल्या एका महिन्यापासून बंद आहे. याचे कारण म्हणजे, कच्चा माल म्हणजे, मोहरीचा तुटवडा आहे. मोहरी मिळत नसल्याने महिनाभरापासून तेल गाळपाचे काम बंद आहे. तेल उद्योगाच्या इतिहासात असे प्रथमच होत आहे. अशी स्थिती आणखी सव्वा महिना राहील. म्हणजे नवीन मोहरीची आवक झाल्यावर तेल गिरण्यांची चाके फिरतील. मोहरीच्या कमतरतेमुळे मोहरी पट्टा, मध्य प्रदेशचा भिंड, मुरैना, ग्वाल्हेर, उत्तर प्रदेशचे आग्रा, मथुरा व राजस्थान धौलपूर, भरतपूर, अलवर, करौली, सवाई माधोपूर, कोटा, बारा, बुंदीपासून गंगानगरपर्यंत आहे. भरतपूर मोहरी पिकाचे कोठार आहे. मस्टर्ड ऑइल प्रोड्युसर असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस कृष्णकुमार अग्रवाल म्हणाले, कोराना काळात मोहरी तेलाची माेठी मागणी हाेती. तेल गिरण्यांनी दीड ते दुप्पट क्षमतेसोबत मोहरीचे गाळप केले होते.

या वर्षी १०० लाख टन मोहरीचा अंदाज
राष्ट्रीय मोहरी संशोधन केंद्राचे संचालक पी. के. राय यांच्या म्हणण्यानुसार, या वर्षी मोहरी पीक चांगल्या वाढीचे आहे. हवामान अनुकूल राहिल्याने क्षेत्रही वाढले आहे. देशात या वर्षी १०० लाख टनांपेक्षा जास्त उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखान्यांना मोहरीच्या कमतरतेचा सामना करावा लागणार नाही.

राजस्थानच्या मोहरीची प्रतीक्षा
फेब्रुवारीत पंजाब आणि हरियाणातून मोहरी येऊ लागते, मात्र या वेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे या दोन राज्यांतून मोहरी येत नाही. राजस्थानची मोहरी मार्चच्या सुरुवातीपासून येईल. त्यानंतर मोहरीची उपलब्धता वाढेल. – अनुज गुप्ता, एव्हीपी रिसर्च, एंजेल ब्रोकिंग

नवी मोहरी आल्यावर किमती पडतील
नव्या मोहरीचे पीक आल्यानंतर किमतीत घट येण्याची शक्यता आहे. ब्रोकर पुनीत गोयल म्हणाले, मोहरी पट्ट्यात नवे पीक योग्य पद्धतीने आवक मार्चच्या सुरुवातीला होईल. या वर्षी ९० लाख टनांपेक्षा जास्त उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मोहरीचा भाव ५ हजार रुपयांपेक्षा खाली येईल. अशा स्थितीत कारखाने आणि स्टॉकिस्ट सध्या शांत आहेत.

नवी मोहरी येण्यास एक महिना लागेल
नव्या मोहरी पिकाची आवक होण्यास महिनाभराचा विलंब आहे. प्रतापगड, नीमच, निंबाहेडा, कोटा मंडीत नवी मोहरी येत आहे. मात्र, यामध्ये आर्द्रता खूप आहे आणि भावही जास्त आहे. प्रमुख अाडते भुपेंद्र गोयल यांच्यानुसार, या बाजार समित्यांत बुधवारी नव्या मोहरीचा भाव ५६०० रु. क्विंटल होता. आर्द्रता असल्याने तेलाचा रंग हिरवा राहतो.


ADVERTISEMENT
Previous Post

सहायक कामगार आयुक्त ‘एसीबी’च्या जाळ्यात दोन लाख घेताना रंगेहाथ पकडले

Next Post

औरंगाबाद : उद्योगाला वीज बिलावर मिळणारी सबसिडी रद्द, महिन्याला लाखो रुपयांचा फटका

Next Post

औरंगाबाद : उद्योगाला वीज बिलावर मिळणारी सबसिडी रद्द, महिन्याला लाखो रुपयांचा फटका

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी : श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर

March 6, 2021

जिल्ह्यातील चार टोळ्यातील 18 जण तडीपार जिल्हा पोलीस प्रमुखांची मोठी कारवाई : नागरिकांतून समाधान

March 6, 2021
औंध येथील उपोषणकर्ते ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांच्याशी चर्चा करताना तालुका कूषी अधिकारी राहुल जितकर व अन्य

औंध येथील ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांचे बेमुदत उपोषण पाचव्या दिवशी ही सुरू; तालुका कूषी अधिकार्यांची उपोषण स्थळी भेट

March 6, 2021

महिलेचा विनयभंग

March 6, 2021

धारदार शस्त्राने वार करून सव्वा लाखाचा ऐवज लुटला 

March 6, 2021

आईसाहेब महाराज पालखी सोहळ्याचे भाडळी बु.।। येथे स्वागत

March 6, 2021

महिला दिनानिमित्त बोरावके हिरो मध्ये सर्व स्कूटरवर भरघोस सूट

March 6, 2021

भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे; कॉलिटी कंट्रोल मार्फत तपासणी करूनच रस्त्याची कामे सुरू करावीत : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 6, 2021

बांध फोडल्याचा जाब विचारलाच्या मारहाणीत सहा जण जखमी

March 6, 2021

ताथवडा घाटात दरोडा टाकून लूटमार करणाऱ्या टोळी फलटण ग्रामीण पोलिसांकडून जेलबंद

March 6, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.