तावडी व कुरवली खुर्द येथील राजे गटाच्या कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
तावडी गावातील विकासासाठी सतत प्रयत्नशील असलेले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश सूर्यकांत निंबाळकर व सौ. मनिषा खंडेराव निंबाळकर, खंडेराव मारुती निंबाळकर (फौजी), व नारायण जयवंत निंबाळकर (फौजी) यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

याप्रसंगी तावडी गावाचे माजी सरपंच शिवाजीराव जाधव, माजी उपसरपंच योगेश गायकवाड, बुथप्रमुख सुरेश निंबाळकर, अजित जाधव, प्रतीक निंबाळकर, मयूर अहिरेकर, रामभाऊ होले, जगन्नाथ मदने, संग्राम शिंदे, मनोज घनवट, लालासो घनवट, उत्तम मदने, नंदकुमार होले, राजेंद्र निंबाळकर, राजेंद्र चव्हाण, नारायण शेवते, संजय निंबाळकर, सचिन निंबाळकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, कुरवली खुर्द गावातील राष्ट्रवादीचे महादेव गोळे, माजी व्हा. चेअरमन कुरवली सोसायटी व राजेंद्र गोळे माजी सदस्य कुरवली खुर्द सोसायटी यांनीही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी अभिजित भैया नाईक निंबाळकर, महेंद्र गोळे, जगन्नाथ गोळे, राजेंद्र चोरमले, अनिल तोडकर, चंद्रकांत गोळे, माधव साळुंखे, विनायक गोळे, धनंजय घनवट, संजय गोळे, अविनाश घनवट, सागर गोळे व नवनाथ बागल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!