नोब्रोकरहूडला पीसीआय डीएसएस लेव्हल १ प्रमाणपत्र मिळाले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ जून २०२२ । मुंबई । नोब्रोकरहूड या नोब्रोकरच्या सोसायटी सुपर अॅपने प्रख्यात सर्वोच्च स्तरीय पीसीआय डीएसएस प्रमाणन मिळवण्यासह पहिले रिअल इस्टेट सोसायटी अॅप बनत त्यांची ईआरपी ऑफरिंग प्रबळ केली आहे. व्यासपीठावर वार्षिक ६० लाखांहून अधिक व्यवहार केल्यानंतरच हे प्रमाणन दिले जाते. पीसीआय डीएसएस हे पीसीआय सिक्युरिटी स्टॅण्डर्ड्स कौन्सिलने ग्राहकांच्या पेमेंट कार्ड माहितीच्या सुरक्षिततेकरिता ‘मिनिमम सिक्युरिटी स्टॅण्डर्ड’ स्थापित करण्यासाठी अवलंबलेले नेटवर्क सिक्युरिटी व व्यवसाय सर्वोत्तम पद्धती मार्गदर्शकतत्त्वांचा संच आहे. कंपनीने ग्राहकांच्या डेटा संरक्षणाप्रती प्रबळ कटिबद्धतेसह आपली उपस्थिती अधिक दृढ केली आहे.

युजर डेटा अधिक सुरक्षित करण्याच्या प्रयत्नासोबत आयएसओ २७००१ प्रमाणन मिळवण्यासह व्यासपीठाने आपल्या शिरपेच्यात आणखी एका तु-याची भर केली आहे आणि सोसायटी अॅप्समधील आपले प्रभुत्व कायम ठेवले आहे. ३ दशलक्षाहून अधिक कुटुंबांनी नोब्रोकरहूडमध्ये प्रवेश केला आहे. सर्वात सुरक्षित व प्रगत पेमेंट सिस्टम आणि कमीत-कमी पेमेंट अयशस्वी होण्यासह त्यांच्या पेमेंट प्रक्रियेवर युजर्सना विश्वास निर्माण झाला आहे. ते युजर्सना सुलभ, गतीशील अनुभव देखील देतात.

नोब्रोकरचे सह-संस्थापक व सीटीओ अखिल गुप्ता म्हणाले, “आम्हाला व्यासपीठावर लाखो व्यवहार होताना दिसण्यात आले आहेत आणि एक कंपनी म्हणून आम्हाला हे प्रमाणन मिळाल्याचा आनंद होत आहे. यामुळे निवासी व व्यवस्थापन समिती सदस्यांचा व्यासपीठावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. आम्ही विना अतिरिक्त खर्चामध्ये सोसायटी अकाऊंट्ससाठी निवासी व्यवहारांचे त्वरित सेटलमेंट करणारे देशातील एकमेव ईआरपी आहोत, तसेच आम्ही इतर अॅप्सच्या तुलनेत निवासींना यूपीआयवर मोफतपणे आणि नॉन-यूपीआयसाठी ५० टक्के कमी शुल्कामध्ये व्यवहार करण्याची सुविधा देतो.”

हे त्वरित सेटलमेंट वैशिष्ट्य सोसायटींकरिता वरदान ठरले आहे. ते अकाऊंटण्ट/सीए नियुक्त न करता आपोआपपणे त्यांचे बँक स्टेटमेंट्स समेट करू शकले आहेत. ही अतिरिक्त बचत आहे, जी निवासींना परत मिळते.

ते पुढे म्हणाले, “आम्ही दर्जात्मक एक-थांबा-शॉप अॅप सादर करणारे पहिले व्यासपीठ होतो, ज्यामुळे सोसायटींना निवासींकडून पेमेंट्स गोळा करण्यासोबत विक्रेते, विक्रेत्याचे पेमेंट, संपत्ती व्यवस्थापन, मालमत्तांची प्रतिबंधात्मक देखरेख, तसेच बूम बेरियर्सच्या माध्यमातून ऑटोमेटेड सुरक्षित एण्ट्रीज आणि नो-टच/पिन-लेस एण्ट्रीजसह आमच्या पेटेण्ट पेन्डिंग इन्वेंशनचा वापर करत सुविधा मिळतात.”

नोब्रोकरहूड हे पहिले रिअल इस्टेट ईआरपी देखील आहे, जे बी२बी व बी२सी बिलिंगला पाठिंबा देऊ शकते. हे आता ई-इन्व्हॉईस प्रमाणित आहे आणि १ एप्रिल २०२२ पासून लागू सरकार अधिसूचना ०१-२०२२ नुसार जीएसटीआयएन व्यासपीठावर ई-इन्व्हॉईस निर्माण करू शकते.


Back to top button
Don`t copy text!