शून्यने व्यापाऱ्यांना ३.५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०५ मे २०२३ । मुंबई । शून्य या आघाडीच्या झिरो-ब्रोकरेज प्लॅटफॉर्मने आपल्या बाधित ग्राहकांना सहाय्य करण्याचा व गेल्या महिन्यात १३ एप्रिल, २०२३ रोजी निर्माण झालेल्या तांत्रिक समस्येमुळे झालेल्या त्यांच्या नुकसानीची भरपाई करण्याचा व्यवसाय निर्णय घेतला आहे. कंपनीने ३ मे २०२३ रोजी ३.५ कोटी रुपयांची भरपाई दिली आणि ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्याच्या प्रक्रियेला वेग दिला.

संपूर्ण लेखापरीक्षण आणि मॉक ट्रेड्सच्या माध्यमातून कंपनीने कथित तांत्रिक समस्येचे निराकरण केले आणि पुढील व्यापार सत्रातच प्लॅटफॉर्म पूर्वपदावर आणला. ज्या ग्राहकांनी कथित दिवशी सकाळी ९:१५ ते ९:३० या कालावधीत पहिल्या ट्रेड्ससाठी लॉगइन केले त्यांनाच या समस्येचा फटका बसला. कंपनीने ट्रेडिंगच्या सुरुवातीच्या तासांपासून ग्राहकांसोबत पारदर्शकता राखली आणि त्यांना वेळोवेळी महत्त्वाची माहिती देणे सातत्याने सुरू ठेवले.

यावर तोडगा काढण्यासाठी कंपनीने बाधित ग्राहकांना या समस्येमुळे खुल्या झालेल्या पोझिशन्स बंद करण्याची आणि त्यांच्या तक्रारी कंपनीच्या समर्पित ईमेल आयडीवर पाठवण्याची विनंती केली. तांत्रिक समस्येमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बांधील नसला, तरीही शून्यने कायमच आपल्या ग्राहकांची मान राखला आहे. म्हणूनच विश्वासार्ह नुकसानीची भरपाई ग्राहकांना देण्याचा निर्णय कंपनीने घेतला. ३ मे २०२३ या तारखेपर्यंत कंपनीकडे सुमारे ७०० तक्रारी प्राप्त झाल्या, त्यातील ७७.३६ टक्के तक्रारी भरपाईसाठी पात्र होत्या. कंपनीने अशा ८१.४५ टक्के तक्रारींचे निराकरण केले आहे आणि बाधित ग्राहकांशी चर्चा कायम ठेवली आहे.


Back to top button
Don`t copy text!