मुकेश-नीता अंबानी बनले आजी-अजोबा, आकाश आणि श्लोका यांना पुत्र प्राप्ती


 

स्थैर्य, दि.१०: देशातील टॉप बिझनेसमन मुकेश
अंबानी आणि त्याच्या पत्नी नीता अंबानी हे आजी-अजोबा बनले आहेत. त्याचा
मुलगा आकाश अंबानीची पत्नी श्लोकाने गुरुवारी सकाळी 11 वाजता मुलाला जन्म
दिला आहे. आकाश आणि श्लोकाचे लग्न 9 मार्च 2019 ला झाले होते. त्यांच्या
लग्नाच्या सेलिब्रेशनची चर्चा देशासह जगात झाली होती.

अंबानींनी गेल्यावर्षी टॉय चेन खरेदी केली तर लोकांनी उडवली खिल्ली

गेल्यावर्षी,
मुकेश अंबानींची कंपनी, रिलायन्सने जवळपास 620 कोटी रुपयांमध्ये ब्रिटेनचा
टॉय ब्रांड हॅमलेज ग्लोबल होल्डिंग्स लिमिटेड खरेदी केले होते. तेव्हा लोक
सोशल मीडियावर खिल्ली उडवत होते की, मुकेश अंबानी आपल्या येणाऱ्या
नातवासाठी पहिलेच खेळणी जमा करत आहेत.

कोरोना काळातही फायद्यात राहिला रिलायन्स ग्रुप

कोरोनाच्या
कठीण काळात देश आणि जगातील कंपन्यांचे मोठे नुकसान झाले मात्र रिलायन्स
ग्रुप फायद्यात राहिला. रिलायन्स जियोने यावर्षी आपली हिस्सेदारी विकून
जवळपास पाच लाख कोटी जमा केले.

आकाशची स्कूल फ्रेंड आहे श्लोका

काशा
आणि श्लोका शाळेपासून फ्रेंड होते. दोघांचे शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी
इंटरनॅशनल स्कूलमधून झाले. श्लोकाने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिकल
सायन्समधून लॉमध्ये मास्टर्स डिग्री कंप्लीट केली आहे. बिझनेसलेडीसोबतच
श्लोका एक सोशल वर्करही आहे. श्लोकाने 2015 मध्ये कनेक्ट ​​​​ फॉर या
नावाने एनजीओ सुरू केली होती. जी गरजूंना शिक्षण, भोजन आणि घर उपलब्ध करुन
देते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!