फलटण तालुक्यातील निरगुडीचै सौ. दीपाली गोरे यांनी उद्योग निरीक्षक पदी निवड


दैनिक स्थैर्य । दि. १२ जानेवारी २०२३ । निरगुडी । फलटण तालुक्यातील निरगुडी येथील सौ. दिपाली अमित गोरे यांची महाराष्ट्र शासनाच्या उद्योग निरीक्षक पदी नियुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षांमधून सदरील नियुक्ती करण्यात आलेली आहे.

उद्योग निरिक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल उत्पादन शुल्क अधिकारी शिवाजी काळे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे, सुनिल गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सौ. दीपाली गोरे यांचे त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळोली तर माध्यमिक शिक्षण जनता विद्यालय मळोली त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण यशवंतराव चव्हाण इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथे संपन्न झाले. पदवी परीक्षा बी.टेक. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे झाले.

यावेळी पोस्ट मिळाल्याचा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही. कोणतेही क्लासेस न लावता 2019 मध्ये फलटणमध्ये एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. यामध्ये खूप आव्हाने होती. पण खचून न जाता त्या आव्हानाला सामोरी गेले आणि यश मिळाले. या यशामध्ये माहेरच्या आणि सासरच्या लोकांनी केलेला त्याग आणि पाठिंबा या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.

स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी मी एवढे नक्की सांगेन, “हरुन नका जाऊ जोपर्यंत पोस्ट मिळत नाही तोपर्यंत लढत राहा यश नक्की मिळेल”. यावेळी अमित गोरे (फौजी), अमित आवटे, अक्षय आवटे, आदेश गोरे, गणेश गोरे इत्यादी उपस्थित होते.


Don`t copy text!