
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. १२ जानेवारी २०२३ । वाघळवाडी । वाघळवाडीच्या उत्कर्ष माध्यमिक व कनिष्ठ विद्यालय आशमशाळेत करिअर मार्गदर्शन शिबीर एन. के. कॉमर्स क्लासेस तर्फे घेण्यात आले. प्रा. निखिल कापले यांनी मुलांनी भविष्यातील वाटचाल कशी करावी याची माहिती दिली.
स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमता कशा ओळखायच्या तसेच सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात कॉमर्स मध्ये करियर किती फायदेशीर आहे, याची सविस्तर माहिती प्रा. निखिल कापले यांनी दिली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी सावंत, सहशिक्षिका देशमुख, कोरे, गायकवाड कार्यक्रमाचे आभार कोरे यांनी मानले.
