
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. १२ जानेवारी २०२३ । फलटण । थिंक डॉट कॉम या संस्थेच्या माध्यमातून फलटण येथे सोमवार व मंगळवार दिनांक 16 व 17 जानेवारी 2022 रोजी फलटण तालुका संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये फलटण शहर व फलटण तालुक्यातील ज्या लेखकांची कथा, चरित्र नाटक, कविता व इतर विषयांवरील पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्या पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन या संमेलनात करण्यात आलेले आहे. तरी सर्व लेखक यांना विनंती आहे की आपली प्रकाशित पुस्तके किंवा आपल्या मित्र परिवार यांची प्रकाशित पुस्तके तात्काळ आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यालय शंकर मार्केट, फलटण येथे जमा करावीत, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे प्रमुख कार्यवाह अमर शेंडे (मो.बा.: 9922778386) यांनी केले आहे.
