खासदार रणजितसिंह यांना फलटण तालुक्यातून १ लाखापेक्षा जास्त मताधिक्क्य मिळेल

अ‍ॅड. जिजामाला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना विश्वास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २८ एप्रिल २०२४ | फलटण |
‘जय श्रीराम’च्या घोषणेत भारतीय जनता पार्टीच्या फलटण शहरात काढण्यात आलेल्या दणदणीत आणि भव्य रॅलीला फलटणकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पाणी, रेल्वे, एमआयङीसी, रस्ते इ. साठी केलेली मोठी विकासकामे पाहता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फलटण तालुक्यातून १ लाखापेक्षा जास्त मताधिक्क्य मिळेल, असा विश्वास अ‍ॅड. जिजामाला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.

माढा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार रॅलीचा शुभारंभ अहिल्यानगर येथील स्वामी समर्थ मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्यानंतर काढण्यात आलेल्या प्रचंड रॅलीमध्ये जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अ‍ॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर बोलत होत्या.

यावेळी सौ. मनिषाताई नाईक-निंबाळकर, माजी नगरसेवक व गटनेते अशोकराव जाधव, माजी नगरसेवक अजय माळवे, अनुप शहा, सचिन अहिवळे, फिरोज आतार, सुधीर अहिवळे, आबा बेंद्रे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदिप चोरमले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना अ‍ॅड. जिजामाला निंबाळकर म्हणाल्या की, फलटण तालुका आणि माढा लोकसभा मतदारसंघात पाणी, रेल्वे, एमआयडीसी, रस्ते आदी कामांचा प्रचंड प्रमाणात विकास केला आहे. यामुळे सर्वसामान्य जनता ही पुन्हा आशिर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा आपल्या फलटणचा आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचा प्रचंड प्रमाणात विकास करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या कर्तृत्ववान उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून दिल्लीच्या तक्तावरती फलटणचा सुपुत्र पुन्हा विराजमान होईल, यासाठी सर्वांनी गटतट न पाहता सर्वांनी आपल्या खासदारांना मतदान करावे. फलटण तालुक्यातून एक लाखापेक्षा जास्त मताधिक्क्य मिळेल, असा विश्वास जिजामाला यांनी यावेळी व्यक्त केला.

रॅलीमध्ये माजी नगरसेवक भरत बेङके, झाकिर मणेर, आण्णा घाडगे, अमरसिंह नाईक-निंबाळकर, अमोल सस्ते, संजय चिटणीस, डॉ. प्रविण आगवणे, मेहबूब मेटकरी, संदीप कांबळे, वस्ताद चंदन काकडे, बाळासाहेब ननवरे, भाजपाच्या महिला अध्यक्षा उषा राऊत, ङॉ. श्रीवास्तव, सूर्यकांत दोशी भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर गजानन चौक, उमाजी नाईक चौक परिसरात पदयात्रा काढण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!