‘गजानन सुझुकी’मध्ये एक्सेस खरेदीसाठी ‘मान्सून ऑफर्स’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १० जुलै २०२४ | सातारा |
सातार्‍यातील सर्वात जुनी व प्रतिथयश टू व्हीलर डीलरशिप कंपनी ‘गजानन सुझुकी’ला १६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आकर्षक ऑफर्स ठेवल्या आहेत.

ग्राहकांची आवडती सुझुकी ‘एक्सेस’ सर्व कलर व मॉडेल्समध्ये हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहे. सुझुकी एक्सेस खरेदी करणार्‍या ग्राहकांना तीन वर्षांची अतिरिक्त वॉरंटी, बॉडी कव्हर मोफत मिळणार आहे.

सुझुकी ‘अवेनिस’ या स्कूटरवर ‘इन्शुरन्स फ्री’ ऑफर चालू आहे. एवेनिस तिच्या स्पोर्टी लूक व स्पोर्टी कलरमुळे विद्यार्थी वर्गात व गृहिणींमध्ये चांगलीच भाव खाऊन आहे.

सुझुकीचा सर्व मॉडेल्समध्ये ब्लूटूथ कनेक्ट, मोठा डीपी स्पेस, आरामदायक लेगस्पेस, आरामदायी सस्पेन्शन, मोबाईल चार्जिंग पॉईंट, चालवायला सुरक्षित आणि सोपी, तुलनेने कमी देखभाल खर्च, उत्तम रिसेल व्हॅल्यू असल्याने ग्राहकांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रियता वाढतच आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष चालू होत आहे. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी खास १००% टक्के कर्ज, ४८ सुलभ हप्त्यात, ८.९९% व्याजदरावर उपलब्ध आहे.

सुझुकी ‘जिक्सर’ खरेदीवर वीस हजारांपर्यंत एक्स्चेंज बोनस, रायडिंग जॅकेट गिफ्ट, दहा वर्षाच्या अतिरिक्त वॉरंटीसह जिक्सर विविध आकर्षक स्पोर्टी कलरमध्ये उपलब्ध आहे.

गजानन सुझुकीने सोळा वर्षात तीस हजारांपेक्षा जास्त ग्राहकांना विक्री व सेवा पुरवली आहे. गजानन सुझुकीच्या सोळा वर्षपूर्तीनिमित्त ठेवलेल्या ऑफर्सचा सर्व ग्राहकांनी गजानन सुझुकीच्या सातारा, फलटण, कोरेगाव, वाई, शिरवळ येथील शाखांमध्ये जाऊन लाभ घ्यावा, असे आवाहन गजानन सुझुकीचे संचालक सचिनदादा शेळके यांनी सर्वांना केले आहे.

गजानन सुझुकीचा फलटणचा पत्ता – जिंती नाका, फलटण, मोबाईल नंबर – ८६०००१३९४८.


Back to top button
Don`t copy text!