राजमाता अहिल्यादेवी गणेश मंडळ व लायन्स क्लब फलटण गोल्डन यांच्यातर्फे वारकर्‍यांना अल्पोपहार


दैनिक स्थैर्य | दि. १० जुलै २०२४ | फलटण |
संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आगमन ऐतिहासिक फलटण नगरीमध्ये झाल्यानंतर राजमाता अहिल्यादेवी गणेश मंडळ आणि लायन्स क्लब फलटण गोल्डन यांच्या संयुक्त विद्यमाने हजारो वारकर्‍यांना अल्पोपहार देण्यात आला.

यावेळी वारकर्‍यांची नेत्रतपासणी करून चष्म्याचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदिप चोरमले तसेच मंडळाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच लायन्स क्लब फलटण गोल्डनच्या नूतन अध्यक्षा लायन सौ. स्वाती चोरमले, एमजेएफला भोजराज नाईक निंबाळकर, लायन मंगेशशेठ दोशी, अध्यक्ष लायन जगदीश करवा, माजी अध्यक्ष लायन सौ. निलम देशमुख, ट्रेझरर लायन सौ. संध्या गायकवाड, लायन सौ. सुनिता कदम, सौ. सोनाली बेडके, अजिंक्य बेडके, प्रशांत काळे, विठ्ठल चोरमले, तुषार चोरमले, सुभाष चोरमले, राजूनाना चोरमले, राहुल शहा, राजाभाऊ देशमाने, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नेत्र तपासणीसाठी डॉ. बाबर आणि डॉ. लता मोरे तसेच समाजसेविका सौ. प्रीती भोजने, मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!