दैनिक स्थैर्य | दि. 06 मार्च 2024 | फलटण | फलटणला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाले असून MH 53 असा नंबर फलटणला मिळाला आहे. यामुळे यामुळे फलटणची नवीन ओळख तयार झाली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नाने सदरील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाले आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून फलटणमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
फलटणला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर केल्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विविध स्तरांमधून अभिनंदन होत आहे.