खासदार रणजितसिंहच महायुतीचे माढ्याचे उमेदवार?


दैनिक स्थैर्य | दि. 07 मार्च 2024 | फलटण | आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेच्या वतीने माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार हे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच असणार आहेत; असे मेसेजेस सोशल मीडियाच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह यांचे कार्यकर्ते व्हायरल करत आहेत.

गेले दोन दिवस मुंबईमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या जागा वाटपाबाबत मॅरेथॉन बैठका घेण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक मतदारसंघाचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये महायुती तयार झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघ निहाय भारतीय जनता पार्टीने आखणी केलेली आहे. त्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार हे भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे माढा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास स्पष्ट होत आहे.

या झालेल्या बैठकीनंतर माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आपली उमेदवारी अंतिम झाली असल्याबाबतचे मेसेज व्हायरल केलेले आहेत.

– नक्की काय आहे व्हायरल झालेला मेसेज –

 

“माझी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्या माढा लोकसभा मतदार संघातून आपल्या फलटण तालुक्याचे सुपुत्र जलनायक खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे आपल्या तालुक्याचे कर्तृत्ववान नेतृत्व यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी आपले सर्व हेवेदावे बाजूला ठेवून खासदार साहेबांना पुन्हा निवडून आणण्यासाठी सर्वांनी तयारीला लागावे.

धन्यवाद!

कहो दिल से खासदार साहेब फिरसे”


Back to top button
Don`t copy text!