भाडळी खुर्द: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त हरिनाम सप्ताह व बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भाडळी खुर्द येथे ग्रामस्थ व तरुणांच्या वतीने भक्ती आणि संस्कारांचा संगम घडवून आणणाऱ्या संयुक्त उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

स्थैर्य, भाडळी खुर्द, दि. १३ जून : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीचे औचित्य साधून मौजे भाडळी खुर्द (ता. फलटण) येथे ग्रामस्थ आणि तरुण सहकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने “त्रिदिनी हरिनाम सप्ताह” आणि “बालसंस्कार शिबीर” या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.

भक्ती आणि संस्कारांचा संगम

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त केवळ उत्सव साजरा न करता, गावात आध्यात्मिक आणि वैचारिक प्रबोधन व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून गावकऱ्यांना नामस्मरणाचा आनंद घेता येणार आहे, तर बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून भावी पिढीवर उत्तम मूल्ये आणि संस्कार रुजवण्याचा स्तुत्य प्रयत्न गावातील तरुणांनी सुरू केला आहे.

उद्घाटन सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती

या त्रिदिनी हरिनाम सप्ताह व बालसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी परिसरातील अनेक मान्यवर व कीर्तनकार उपस्थित होते:

ह.भ.प. हरिदास महाराज जगदाळे, ह.भ.प. साखरे महाराज, ह.भ.प. संतोष भांड, ह.भ.प. रविकुमार ठावरे, ह.भ.प. तन्मय महाराज जाधव, श्री. हनुमंत सोनवलकर (पोलीस पाटील), श्री. राजेंद्र खरात (प्रसिद्ध निवेदक), मातोश्री विविध कार्यकारी सोसायटीचे संस्थापक चेअरमन मोहनराव डांगे यांच्यासह या आध्यात्मिक व संस्कारक्षम सोहळ्याला गावातील तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Back to top button
Don`t copy text!