एमजी मोटरने ३१.९९ लाख रुपयांत ‘ऍडव्हान्स्ड ग्लॉस्टर’ सादर केली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०१ सप्टेंबर २०२२ । मुंबई । एमजी मोटर इंडियाने आज अॅडव्हान्स्ड ग्लॉस्टर लॉन्च केल्याचे जाहीर केले, ज्याची किंमत ३१.९९ लाख रु. पासून सुरू होत आहे. भारतातील पहिली ऑटोनॉमस (लेव्हल I) प्रीमियम एसयूव्ही आता नवीन आणि अधिक सुरक्षा, स्टाइल आणि प्रगत टेक्नॉलॉजीसह उपलब्ध असेल.

ग्लॉस्टर अॅडव्हान्स्ड ड्राइव्हर सिस्टममध्ये या सेग्मेंटमध्ये प्रथमच अशी काही फीचर्स आहेत, उदा. डोअर ओपन वॉर्निंग, रियर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट्स आणि लेन चेंज असिस्ट. सध्याच्या ३० मानक सुरक्षा फीचर्सपेक्षा प्रगत अशा या फीचर्समुळे अॅडव्हान्स्ड ग्लॉस्टर अधिक सुरक्षित आणि स्मूद ड्राइव्हिंगचा अनुभव देते.

अॅडव्हान्स्ड ग्लॉस्टरची रस्त्यावरील ठळक उपस्थिती ४डब्ल्यूडी व्हॅरीयन्टमधील संपूर्णपणे नवीन ब्रिटिश विंडमिल टर्बाईन-थीम असलेल्या अलॉय मेटल व्हील्सनी आणखीन मजबूत केले आहे. ही गाडी आता एका नव्या ‘डीप गोल्डन’ रंगाच्या पर्यायासह सादर करण्यात आली आहे, ज्याच्यामुळे ही एसयूव्ही आणखीनच आकर्षक दिसते. या व्यतिरिक्त यापूर्वी असलेले मेटल ब्लॅक, मेटल अॅश आणि वॉर्म व्हाईट हे रंग तर आहेतच.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर राजीव चाबा म्हणाले, “टेक्नॉलॉजीमध्ये होत असलेले बदल, निरंतर विकास आणि बेस्ट-इन-क्लास ग्राहक अनुभव या गोष्टींना आम्ही एमजीमध्ये विशेष प्राधान्य देतो. ग्लॉस्टर एक बोल्ड, दणकट, वैविध्यपूर्ण आणि आरामदायक गाडी म्हणून ओळखली जाते आणि ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. २डब्ल्यूडी, आणि ४डब्ल्यूडी ट्रिम्स, दमदार इंजिन ऑप्शन्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान, ऑटोनॉमस लेव्हल I आणि माय एमजी शिल्ड पॅकेज असलेली अॅडव्हान्स्ड ग्लॉस्टर नव्या युगाच्या ग्राहकांना खुश आणि उत्तेजित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.”

६ आणि ७-सीटर व्हॅरीयन्टच्या २डब्ल्यूडी आणि ४डब्ल्यूडी पर्यायात उपलब्ध असलेल्या ‘अॅडव्हान्स्ड ग्लॉस्टर’मध्ये अनन्य प्रीमियम लक्झरी आणि बेस्ट-इन-क्लास इंटिरियर स्पेस आहे. अॅडव्हान्स्ड ग्लॉस्टर’ मध्ये दमदार २.० लीटर डिझेल इंजिन आहे. जे दोन पर्यायांत उपलब्ध आहे. यात बेस्ट-इन-सेग्मेंट १५८.५ किलोवॉट पॉवर उत्पन्न करणारे फर्स्ट-इन-सेग्मेंट ट्विन टर्बो डिझेल इंजिन देखील सामील आहे.

‘अॅडव्हान्स्ड ग्लॉस्टर’ प्रवासात देखील मनोरंजन प्रदान करते. यामध्ये सेग्मेंटमधील सर्वोत्तम ३१.२ सेमी टचस्क्रीन आणि १२ स्पीकर्सच्या हाय-क्वालिटी ऑडिओ सिस्टमचा समावेश आहे. शिवाय, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्लेसह फर्स्ट-इन-सेग्मेंट शॉर्टपीडिया न्यूज अॅप आणि आपले आवडते गाणे शोधून देणारे ‘गाना’ अॅप देखील आहे, ज्याला बोलून कमांड देता येतो. या एसयूव्हीने ७५ पेक्षा जास्त कनेक्टेड कार फीचर्सच्या अपग्रेडेड आणि स्मार्ट टेकसह स्वतःला आणखी विशेष आणि प्रगत बनवले आहे.

कम्फर्ट आणि लक्झरी ही एमजी ग्लॉस्टरची ओळख आहे. ‘अॅडव्हान्स्ड ग्लॉस्टर’ने देखील हीच परंपरा सुरू ठेवली आहे. बेस्ट-इन-क्लास फीचर्स, रस्त्यावरील ठळक उपस्थिती, दमदार क्षमता आणि अप्रतिम इंटिरियर ही या गाडीची वैशिष्ट्ये आहेत. या एसयूव्हीमध्ये बुद्धिमान ४ डब्ल्यूडी, ऑल टेरेन सिस्टम, एक ड्युअल पॅनोरमिक इलेक्ट्रिक सनरूफ, १२-वे पॉवर अॅडजस्ट ड्राइव्हर सीट, ड्राइव्हर सीट मसाज आणि व्हेंटिलेशन फीचर तसेच वायरलेस चार्जिंग व इतर अनेक उल्लेखनीय फीचर्स आहेत.

‘अॅडव्हान्स्ड ग्लॉस्टर’ १८० पेक्षा जास्त आफ्टर-सेल्स सर्व्हिस विकल्पांसह व्यक्तिगत कार ओनरशीप प्रोग्राम ‘माय एमजी शील्ड’ देखील प्रदान करेल. या शिवाय, ग्राहकांना स्टँडर्ड ३+३+३ पॅकेज देखील देण्यात येईल म्हणजे, ३ वर्षांची, कितीही किलोमीटर्सची वॉरंटी, तीन वर्षे रोड-साईड असिस्टंस आणि तीन लेबर-मुक्त नियतकालिक सेवा.


Back to top button
Don`t copy text!