स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बँकिंग आणि वित्तीय शेअर्सचा बाजाराला आधार

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
बँकिंग आणि वित्तीय शेअर्सचा बाजाराला आधार
ADVERTISEMENT


 

निफ्टीने ११,४०० अंकांची पातळी ओलांडली, सेन्सेक्सनेही ८० अंकांनी वृद्धी घेतली

स्थैर्य, मुंबई, १९ : बँकिंग आणि वित्तीय शेअर्सनी आधार दिल्यामुळे आजच्या व्यापारी सत्रात भारतीय निर्देशांकांनी सकारात्मक स्थिती दर्शवली. निफ्टीने ०.२०% किंवा २३.०५ अंकांची वृद्धी घेतली व तो ११,४०८.४० अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने ०.२२% किंवा ८६.४७ अंकांची वाढ घेत ३८,६१४.७९ वर विश्रांती घेतली.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास १६५१ शेअर्सनी वृद्धी घेतली, ९२६ शेअर्सची घसरण झाली तर १०४ शेअर्स स्थिर राहिले. झी एंटरटेनमेंट (१४.०६%), गेल (५.००%). भारती एअरटेल (१.८४%), टेक महिंद्रा (२.२४%) आणि मारूती सुझुकी (१.५४%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर बजाज ऑटो (१.२०%), नेस्ले (१.१२%), ओएनजीसी (१.१८%), कोल इंडिया (०.९५%) आणि विप्रो (०.८१%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.

बँकिंग आणि वित्तीय, ऊर्जा, तसेच इन्फ्रा सेक्टर्समध्ये खरेदी दिसून आली. तर आयटी, फार्मा आणि एफएमसीजी क्षेत्रात नकारात्मक ट्रेंड दिसून आला. बीएसई मिडकॅपमध्ये ०.५८% आणि बीएसई स्मॉलकॅपमध्ये १.१६% ची वृद्धी दिसून आली.

डॉ. रेड्डीस लॅबोरटरीज लिमिटेड :कंपनीने फुजीफिल्म तोयमा केमिकल कॉ. लिमिटेडबरोबर जागतिक परवाना देण्याच्या कराराचा एक भाग म्हणून एव्हीगन (फेव्हिपीरावीर) २०० मिलीग्राम टॅबलेट भारतात लाँच केल्याची घोषणा केली. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ०.५२% ची वाढ झाली व त्यांनी ४,४९७.०० रुपयांवर व्यापार केला.

मॅन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड : मॅन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडच्या शेअर्समध्ये ६.४३% ची वाढ झाली व त्यांनी ६४,५५ रुपयांवर व्यापार केला. कंपनीने सध्याच्या आर्थिक वर्षात अंदाजे ४०५ कोटी रुपयांची निर्यात ऑर्डर मिळवल्यानंतर हे परिणाम दिसून आले.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड : आरआयएलचे शेअर्स ०.८७% नी वाढले व त्यांनी २,१३७.०० रुपयांवर व्यापार केला. कंपनीने नेटमेड या ऑनलाइन फार्मसी डिलिव्हरी स्टार्टअपमधील बहुतांश इक्विटी स्टेक संपादित केल्याची घोषणा केली.

सीएसबी बँक लिमिटेड : कंपनीच्या २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा ५३.६ कोटी रुपये झाला तर बँकेचे उत्पन्न ७४.३ कोटी रुपये झाले. परिणामी कंपनीच्या शेअर्समध्ये १२.९२% ची वृद्धी झाली व त्यांनी २२५.०५ रुपयांवर व्यापार केला.

एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेड : एनएचपीडी चौथ्या फेज अंतर्गत एनएस (0) चौपदरीकरणाच्या प्रकल्पासाठी कंपनीला अदानी रोड ट्रान्सपोर्ट लिमिटेडकडून नियुक्त तारखेसाठी एक पत्र मिळाले. कंपनीच्या शेअर्समध्ये २.५०% ची वाढ झाली तर त्यांनी १९६.९५ रुपयांवर व्यापार केला.

भारतीय रुपया : आजच्या सत्रात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने कमकुवत कामगिरी केली. सकारात्मक देशांतर्गत शेअर बाजारात खरेदी दिसून आल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ७४.९३ रुपयांचे मूल्य कमावले.

सोने : डॉलर स्थिर असल्याने आजच्या सत्रात पिवळ्या धातूची किंमत २,००० डॉलर प्रति औसांनी कमी झाली.

जागतिक बाजार : आजच्या सत्रात युरोपियन बाजारपेठेने काहीशी माघार घेतली. तर आशियाई शेअर्सने सात महिन्यांची उच्चांकी पातळी गाठली. नॅसडॅकने ०.७३%, एफटीएसई १०० ने ०.१६%, एफटीएसई एमआयबीने ०.४६%, निक्केई २२५ ने ०.२६% ची वृद्धी दर्शवली. तर हँगसेंगने मात्र ०.७४% ची घसरण अनुभवली.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: अर्थ विषयक
ADVERTISEMENT
Previous Post

ट्रेलची ११.४ दशलक्ष डॉलरची निधी उभारणी

Next Post

पुणे-बेंगलोर महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश

Next Post
पुणे-बेंगलोर महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश

पुणे-बेंगलोर महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

पक्षीय भेद विसरून राज्याच्या प्रश्नांचा पाठपुरावा करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पक्षीय भेद विसरून राज्याच्या प्रश्नांचा पाठपुरावा करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

January 22, 2021
रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधात तक्रार मागे घेतल्यानंतर शरद पवार- आम्ही घेतलेला निर्णय योग्यच होता

रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधात तक्रार मागे घेतल्यानंतर शरद पवार- आम्ही घेतलेला निर्णय योग्यच होता

January 22, 2021
हे तर पवारांचे स्वत:विरूध्दच आंदोलन, भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

हे तर पवारांचे स्वत:विरूध्दच आंदोलन, भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

January 22, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

67 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्य

January 22, 2021
मे महिन्यात होऊ शकतात संघटनेच्या निवडणुका, सोनिया म्हणाल्या – ‘शेतकरी प्रश्नावर सरकारची अमानुषता आश्चर्यकारक’

मे महिन्यात होऊ शकतात संघटनेच्या निवडणुका, सोनिया म्हणाल्या – ‘शेतकरी प्रश्नावर सरकारची अमानुषता आश्चर्यकारक’

January 22, 2021
पाचबत्ती चौक परिसरातील बाणगंगा नदीवरील पुलाकडे पालिकेचे दुर्लक्ष

पाचबत्ती चौक परिसरातील बाणगंगा नदीवरील पुलाकडे पालिकेचे दुर्लक्ष

January 22, 2021
फलटण शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये डांबरीकरण कामाचे भूमिपूजन

फलटण शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये डांबरीकरण कामाचे भूमिपूजन

January 22, 2021
जिल्हा परिषद शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी

जिल्हा परिषद शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी

January 22, 2021
आग लागलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

आग लागलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

January 22, 2021
गणपतराव लोहार यांचे निधन

गणपतराव लोहार यांचे निधन

January 22, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.