इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर; वेळापत्रकात मोठा बदल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १० वी (SSC) आणि १२ वीच्या (HSC) प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

स्थैर्य,सातारा, दि. १८ सप्टेंबर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १० वी आणि १२ वीच्या आगामी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार १२ वीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १६ मार्च या कालावधीत, तर १० वीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.

प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांचे वेळापत्रक

मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, १२ वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान होतील. तसेच १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहेत.

नियोजनासाठी आधीच घोषणा

पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे आणि विद्यार्थ्यांना दडपणाशिवाय परीक्षेची तयारी करता यावी, यासाठी मंडळाने या तारखा आगाऊ जाहीर केल्या आहेत. विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक लवकरच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

 

 

Back to top button
Don`t copy text!