झिरपवाडीचे शिवराज जाधव यांना सेल्फी विथ तिरंगा फोटो स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस


स्थैर्य, फलटण, दि. १७ : सातारा पोलीस दलातील झिरपवाडी ता. फलटण गावचे सुपुत्र शिवराज जाधव यांनी कोल्हापूर येथे झालेली ऑनलाईन सेल्फी विथ तिरंगा फोटो स्पर्धा २०२१ मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले आहे.

झिरपवाडी ता. फलटण गावचे सध्या सातारा पोलीस दलात कार्यरत असणारे शिवराज जाधव यांनी सदरच्या ऑनलाईन फोटो स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसाच्या रक्कमेचा सदुपयोग केला आहे. मिळालेल्या बक्षीसाच्या रक्कमेतून गरीब कुटुंबाला एक महिना पुरेल एवढा किराणा माल देवून आगळा वेगळा आनंद साजरा केला आहे. यावेळी त्यांचे सहकारी निलेश गायकवाड, कुणाल सूर्यवंशी, समीर चव्हाण, कार्तिक जाधव यांनी मिळून गरीब कुटुंबाला किराणा दिला आहे.

शिवराज जाधव यांनी या ऑनलाईन फोटो स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी जर आपल्याला बक्षीस मिळाले तर त्या बक्षिसाची रक्कम गरीब कुटुंबाला देणार अशी इच्छा व्यक्त केली होती. त्या इच्छेतून बक्षीस मिळाले व त्या रक्कमेतून एका गरीब कुटुंबाला एक महिना पुरेल एवढा किराणा दिला आहे. झिरपवाडी ता. फलटण गावचे सातारा पोलीस दलात कार्यरत असणारे शिवराज जाधव यांच्या या उपक्रमाबद्दल अनेकांनी कौतुक केले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!