एसटीच्या एनसीएमसी कार्ड रिचार्जमध्ये मोठा घोळ; प्रवाशांच्या खिशाला बसतोय फटका

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

एसटीच्या एनसीएमसी कार्डच्या रिचार्जवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शुल्क कपात होत असल्याने प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १६ सप्टेंबर : एसटी प्रवासातील सवलतींसाठी अनिवार्य केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) रिचार्ज प्रक्रियेत मोठा गोंधळ समोर आला आहे. बसस्थानकावरील वाहकाकडे कार्ड रिचार्ज केल्यास कमी रक्कम कपात होते, तर खाजगी एजंटकडे केल्यास अधिक शुल्क आकारले जात आहे. या वेगवेगळ्या कपातीमुळे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून जादा कापलेली रक्कम नेमकी कोणाच्या खिशात जाते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

एसटीच्या एनसीएमसी कार्ड रिचार्जमध्ये तफावत

सातारा बसस्थानकासह संपूर्ण जिल्ह्यात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतींच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, या कार्डच्या रिचार्ज प्रक्रियेत ‘लागू शुल्क’ आणि ‘सुविधा शुल्का’च्या नावाखाली भिन्न रकमा कपात होत आहेत. १०० रुपयांच्या रिचार्जवर वाहकाच्या मशिनमधून केवळ ९८.९४ रुपये जमा होऊन सुमारे १.०६ रुपये कपात होतात. मात्र, हाच १०० रुपयांचा रिचार्ज एजंटकडे केल्यास कार्डवर ८७.१४ रुपयेच जमा होतात आणि तब्बल १२.८६ रुपयांची कपात केली जाते.

एजंट आणि प्रवाशांमध्ये वाढता संभ्रम

एकाच कार्डासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दराने कपात होत असल्याने ही अतिरिक्त रक्कम नेमकी कोणाच्या खात्यात जाते, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे, कार्ड इश्यू करणाऱ्या ई-बेक्स कंपनीकडून योग्य माहिती न मिळाल्याने एजंटही या कपातीबाबत अनभिज्ञ आहेत. कंपनीकडून तांत्रिक सहकार्य न मिळणे, सर्व्हर डाऊन असणे आणि अडकलेले पैसे उशिरा मिळणे यामुळे एजंट आणि प्रवासी दोघेही त्रस्त झाले आहेत.

 

 

Back to top button
Don`t copy text!