मतदारयादीत नाव नोंदवण्याची सुवर्णसंधी; साताऱ्यात ‘या’ तारखांना भरणार विशेष शिबिर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

मतदारयादीत नाव नोंदवण्यासाठी तसेच दुरुस्तीसाठी सातारा जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १६ सप्टेंबर : मतदारयादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. १ ऑक्टोबर रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांना मतदारयादीत नाव नोंदवण्याची ही विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बीएलओ केंद्रावर राहणार उपस्थित

या विशेष शिबिरांच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत उपस्थित राहणार आहेत. प्रारूप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट नसलेले नागरिक, गैरहजर, स्थलांतरित किंवा नाव वगळले गेलेले नागरिक या शिबिरामध्ये नवीन नाव नोंदणी, दुरुस्ती अथवा नाव वगळण्यासाठी अर्ज करू शकतात.

आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

महिला, दिव्यांग, तृतीयपंथी आणि तरुण मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. पात्र नागरिकांनी रहिवासाचा पुरावा आणि वयाचा दाखला यांसारख्या आवश्यक कागदपत्रांसह आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

 

Back to top button
Don`t copy text!