गादी सेंटरला लागलेल्या आगीत 5 लाख रुपयांचे नुकसान

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. 02 :  देगाव फाटा, ता. सातारा येथील गादी सेंटरला लागलेल्या आगीत 5 लाख रुपयांचे नुकसान झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,  देगाव फाटा, ता. सातारा येथील भंडारी हाईट्स या इमारतीमध्ये अरुण यादव यांच्या मालकीचे गादी सेंटरचे दुकान आहे.  या दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही घटना समजताच शेजारचे दुकानदार व स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला दिली. अग्निशामक दलाची गाडी येईपर्यंत दुकानदार व स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, पोलीस व वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये गादी सेंटरचे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने यात कसलीही जीवित हानी झाली नाही. अग्निशामक दलाने साधारण एक तास शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!