लोणंद पोलीसांची कामगिरी कौतुकास्पद : तानाजी बरडे


कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे. समवेत दिलीप मुळीक, रामचंद्र लावंड, अनिल शिंदे व सतीश जाधव.


स्थैर्य, फलटण दि.२३ : पोलीस अधिकारी व कर्मचारी नेहमीच कर्तव्यदक्ष राहून आपली सेवा बजावत असतात. लोणंद पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी देखील यात अग्रेसर असून लोणंद पोलीसांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद राहिली आहे, असे गौरवोद्गार फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी काढले. 

लोणंद परिसरात घडलेल्या चैन स्नॅचिंग प्रकरणाचा छडा लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि संतोष चौंधरी व त्यांच्या सहकार्‍यांनी अत्यंत कमी कालावधीत लावून चोरीस गेलेला मुद्देमाल सर्व संबंधितांना सुपुर्द केला. या कामगिरीबद्दल फलटण तालुका शिक्षक संघाच्यावतीने सर्व पोलीस कर्मचार्‍यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तानाजी बरडे बोलत होते. यावेळी सपोनि संतोष चौधरी, पीएसआय गणेश माने, महेश सपकाळ, संतोष नाळे, श्रीनाथ कदम, केतन लाळगे, दत्ताजी दिघे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अनिल शिंदे यांनी केले. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार रामचंद्र लोखंडे, फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप मुळीक, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक अनिल शिंदे, फलटण तालुका शिक्षक संघाचे सरचिटणीस सतीश जाधव, मधुकर शिंदे, रामचंद्र मलगुडे, किशोर चांदगुडे, भगवान खताळ, भगवान चव्हाण, रविंद्र महामुनी, मनोज चव्हाण, बापूराव गायकवाड, प्रविण चव्हाण, अमोल घनवट, सौ.ज्योती जाधव, सौ.कविता महामुनी, सौ.मनिषा चव्हाण आदी शिक्षक उपस्थित होते. 

सतीश जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!