फलटणला जनजीवन सुरळीत; इंटरनेट बंदने सर्व व्यवहार ठप्प

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 12 सप्टेंबर 2023 | फलटण | सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे झालेल्या घटनेच्या प्रत्यार्थ सातारा जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू करण्यात आलेले आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असून फलटण येथे जनजीवन सुरळीत आहे; परंतु 72 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद केल्याने फलटणमध्ये सर्वच व्यवहार ठप्प झालेले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की; खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू केले आहे. यासोबतच संपूर्ण सातारा जिल्ह्यामधील इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आलेली आहे. यामुळे बँकिंग सेवा सुद्धा ठप्प झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

इंटरनेट बंद केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना लागत असलेले महत्त्वाचे दाखले त्यापैकी उत्पन्नाचा, डोमासाईल यांच्यासह विविध दाखले सुद्धा मिळत नसल्याने ऍडमिशन प्रक्रियेचे सुद्धा दिवस वाढवावेत अशी मागणी महाविद्यालयीन विद्यार्थी करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!