लवकर निदान, लवकर उपचाराद्वारे दूर करुया कुष्ठ व क्षयरोग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १४ सप्टेंबर २०२२ । ठाणे । जगात अनेक वर्षांपासून कुष्ठरोगाची समस्या आढळून येते. पूर्वीच्या काळी कुष्ठरोगावर इलाज नसल्याने व रुग्णास येणारी विद्रुपता व व्यंगामुळे या रुग्णांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा होता. मात्र आता बहुविधऔषधोपचार पद्धतीमुळे कुष्ठरोग कमी होत आहे. गेल्या काही काळापासून कुष्ठरुग्णांची संख्याही कमी होत आहे. कुष्ठरोग हा मुळापासून दूर करण्यासाठी देशात प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर क्षयरुग्णांची संख्याही कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे दि.13 ते 16 सप्टेंबर 2022 आणि 26 सप्टेंबर ते 7 ऑक्टोंबर या दोन टप्प्यात “कुष्ठरुग्ण शोध अभियान” व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत “सक्रिय क्षयरोग शोध मोहीम” संयुक्त मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेविषयी व यासंदर्भातील मार्गदर्शक सुचनाविषयीची माहिती.

राज्यातील 100 टक्के ग्रामीण भाग व शहरी भागातील जोखीमग्रस्त लोकसंख्या असणाऱ्या भागामध्ये कुष्ठरुग्ण शोध मोहिम व सक्रिय क्षयरोग शोध मोहिम 2022-23 राबविण्यात येत आहे.

मोहिमेचा कालावधी :- दि. 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022

उद्देश  पद्धती :

कुष्ठरोग

  • समाजातीलनिदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणणे.
  • नविनसांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे.
  • समाजातकुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे.
  • कुष्ठरोगदुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे.

Ø  क्षयरोग

  • क्षयरोगाचेनिदान न झालेल्या समाजातील क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचारावर आणणे.
  • मोहीमेमध्येप्रशिक्षित पथकाद्वारे गृहभेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना

शोधणे.

  • संशयीतक्षयरुग्णांचे थुंकी नमुने व एक्स रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासणी करून क्षयरोगाचे निदान करणे आणि औषधोपचार सुरु करणे.
  • समाजातक्षयरोगाविषयी जनजागृती करणे.

Ø अशी असेल मोहीम :

  • समन्वयासाठीअभियानांतर्गत विविध समित्यांची स्थापना, बैठका, मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी.
  • राज्यस्तरावरसंबंधित सर्व जिल्हा/ शहरांमधील जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा तसेच राज्यस्तरावर विभागीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली.
  • विविधस्तरावरसुक्ष्मकृती आराखड्यानुसार अभियानाचे नियोजन केले आहे.
  • प्रशिक्षण- आशा व पुरुष स्वयंसेवक व विविध स्तरावरील पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण.
  • कार्यक्षेत्रातअभियानाची प्रसिद्धी व आरोग्य शिक्षण कार्यक्रम.

 

प्रत्यक्ष सर्वेक्षण :- दि.13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर  2022

  • मोहिमेचेसर्वस्तरावरून प्रभावी संनियंत्रण व पर्यवेक्षण.
  • विविधस्तरावरविहित कालावधीत अहवाल सादरीकरण.

घरोघर सर्वेक्षण :- दि.13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर  2022

  • यामोहीमेमध्ये ग्रामीण व शहरी भागातील निवडक टीयुमधील अति जोखीमग्रस्त भागातील घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. घरामधील सर्व सभासदांची कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत शारिरीक तपासणी करण्यात येणार आहे. खालील लक्षणे असलेल्या व्यक्तींची कुष्ठरोगाचे संशयीत म्हणून नोंद घेण्यात येणार आहे.

■ त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम न येणे,

■ जाड, बधीर तेलकट / चकाकणारी त्वचा.

■ त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे.

■ भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे.

■ तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा अथवा जखमा असणे.

■ हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे.

■ त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे.

■ हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातुन वस्तु गळून पडणे, चालतांना पायातुन चप्पल गळून पडणे.

 

क्षयरोगासाठी खालीलपैकी कोणतेही एक लक्षण आढळून आल्यास त्यास संशयित क्षयरुग्ण म्हणून नोंद घेण्यात येणार आहे.

  • दोनआठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला
  • दोनआठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा ताप
  • वजनातलक्षणीय घट
  • थुंकीवाटेरक्त येणे
  • मानेवरीलगाठ
  • एकूण14 दिवसांच्या सर्वेक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे.
  • दररोजएका टिम मार्फत त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागातील 20 ते 25 घरांचे व जोखीमग्रस्त भागातील 30 घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
  • घरातीलसर्व सभासदांची तपासणी करण्यात येईल. (महिला सभासदांची तपासणी आशा मार्फत व पुरुष सभासदांची तपासणी टिम मधील पुरुष कर्मचारी/स्वयंसेवकामार्फत करण्यात येणार आहे.)
  • जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार टीमची संख्या निश्चित करून त्यानुसार कृती आराखडा सादर करण्यात आला आहे.

मोहिमेच्या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यास आपली आरोग्य समस्या सांगून त्यांना सहकार्य करा. कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलनासाठी सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

लक्षात ठेवा :

  • त्वचेवरअसणारा चट्टा तपासून घ्या.
  • कुष्ठरोगाचेलवकर निदान करा.
  • बहुविधऔषधोपचार (एम.डी.टी.)उपचार नियमित घ्या.
  • एम.डी.टीउपचाराने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो.
  • कुष्ठरुग्णांशीभेदभाव करू नये.

क्षयरोगाविषयी अधिक माहितीसाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक १८००११६६६६ वर संपर्क साधावा. कुष्ठरोगासंबंधीच्या अधिक माहितीसाठी 022-24114000 या क्रमांकावर संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्या.

 संकलन –

जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे


Back to top button
Don`t copy text!