मोबाइल अ‍ॅक्शन गेम लाँच करुन अक्षय कुमार म्हणाला – शत्रुचा सामना करा, प्ले स्टोअरवर 50 लाखांहून अधिक झाले रजिस्ट्रेशन


स्थैर्य , मुंबई , दि .२६: बॉलिवूडचा खिलाडी अर्थातच अभिनेता अक्षय कुमारने PUBG या गेम सारखा FAU-G Fearless and United Guards हा भारतीय गेम लॉंच केला आहे. हा मेड इन इंडिया मल्टी- प्लेयर मोबाइल गेम आज 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात लाँच करण्यात आला आहे. त्याचा व्हिडिओ अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

“शत्रुचा सामना करा. आपल्या देशासाठी लढा. आपल्या ध्वजाचे संरक्षण करा. Fearless and United Guards – FAU-G हा गेम आपल्याला फ्रंटलाइन आणि त्यापलीकडे नेईल! तुमच्या मिशनची सुरूवात आज करा.” अशा आशयाचे कॅप्शन अक्षयने या गेमचा व्हिडिओ शेअर करत दिले आहे.

गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीवर आधारित पहिला भाग

अक्षयने गेमचा ट्रेलरही शेअर केला आहे. त्याचा पहिला भाग भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेला संघर्षावर आधारित आहे. पुढील भाग देखील भारतीय युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित असतील. हा गेम बेंगळुरूच्या nCore Games आणि अक्षयने डेव्हलप केला आहे. या कंपनीचे मालक दयानिधी एमजी हे आहेत, तर सीओओ गणेश हंडे आहेत.

प्ले स्टोअरवर 50 लाखांहून अधिक नोंदणी

वृत्तानुसार, गूगल प्ले स्टोअरवर FAU-G चे 50 लाखांहून अधिक रजिस्ट्रेशन झाले आहेत. यापैकी 10 लाख प्री लाँचिंगच्यावेळी केवळ 24 तासांत झाले होते. एन्कोअर गेम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गोंडल यांनी एका चर्चेत सांगितले की, “FAU-G भारतीय सैनिक कसे जगतात आणि ते आपल्यासाठी सीमेवर कसे संघर्ष करतात हे दर्शविण्याचा प्रयत्न करत आहे.”

पब-जीचा व्यवसाय किती होता?

पब-जीचे जगभरात सुमारे 60 कोटींहून अधिक डाउनलोड्स आणि 5 कोटींहून अधिक अॅक्टिवस प्लेअर्स होते. यात लाखोच्या संख्येत भारतीय तरुणांचा समावेश होता. मागील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत या गेमची जगभरात सुमारे 9371 कोटींची उलाढाल झाली. तर त्याचे लाइफटाइम कलेक्शन 22,457 कोटी होते. सप्टेंबर 2020 मध्ये बंदी घालण्यापूर्वी हा भारतातील सर्वात डाउनलोड केलेला गेम होता. सुमारे 17.5 दशलक्ष लोकांनी हा गेम इंस्टॉ​​ल केला होता.


Back to top button
Don`t copy text!