
स्थैर्य, फलटण : कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटणच्या साप्ताहिक कांदा मार्केटमध्ये आज मंगळवार दि. १४ रोजी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून दर समाधानकारक निघाल्याचे बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
आज मंगळवार दि. १४ रोजी ६५०४ कांदा पिशवी म्हणजे ३२५२ क्विंटल कांद्याची आवक झाली असून कांदा प्रति क्विंटल २०० ते ८०१ रुपये, सरासरी ५५० रुपये दराने कांद्याची विक्री झाल्याचे बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.