
स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यातील हणमंतवाडी ग्रामपंचायत हद्दीतील दलित वस्ती मधील १० लाख रुपयाचे गटार योजनेचे काम अतिनिकृष्ट केलेले आहे. सादर गटार एका पावसातच वाहून गेल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभाग फलटण यांच्याकडून देण्यात आलेल्या ठेकेदारास निकृष्ट दर्जाचे काम केले म्हणून फसवणुकीचा गुन्हा दाखल करून सदरच्या ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपग्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आलेला आहे. सदरचे सविस्तर निवेदन फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे फलटण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, शहर अध्यक्ष महादेव गायकवाड व शहर उपाध्यक्ष अजित मोरे यांनी दिलेले आहे.